मुंबई: भारतीय वंशाच्या ड्रायव्हरला दुबईत करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे. अजय ओगुला नावाच्या ड्रायव्हरने एमिरेट्स ड्रॉमध्ये 15 दशलक्ष दिरहम म्हणजेच 33 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. लॉटरीचे बक्षीस जिंकल्यानंतर ड्रायव्हरचे भानच हरपले आणि त्याचा या विजयावर विश्वास बसत नाही. अजयने सांगितले की, मला अजूनही विश्वास बसत नाही की तो जॅकपॉट जिंकला आहे. अजय, जो दक्षिण भारतीय आहे, त्याने एमिरेट्स ड्रॉसाठी तिकीट खरेदी केले होते, जे मॅजिक नंबरशी जुळले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय दक्षिण भारतातील एका गावातून आला आहे. चार वर्षांपूर्वी तो युनाइटेड अरब अमिरातीमध्ये गेला आणि तिथे कार चालवून परिवाराच उदरनिर्वाह करतो. तो एका ज्वेलरी फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो, असे सांगण्यात येत आहे. यासाठी त्याला दरमहा 3200 दिरहम पगार मिळतो. मिडिया रिपोर्टमध्ये सांगितले की ते एका चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून गरिबांना मदत करतात. या रकमेतून चॅरिटी ट्रस्ट स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजय म्हणाला, “यामुळे माझ्या गावी आणि शेजारच्या गावातील अनेक लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात मदत होईल.”
आधी नशीब आजमावले
अजयने सांगितले की, “माझ्या एका मित्राने अलीकडेच एमिरेट्स ड्रॉमध्ये 7,777 दिरहम जिंकले आणि बक्षिसाची रक्कम त्याच्या खात्यात आल्यावर मला खात्री पटली.” अजयने सांगितले की, त्याच्या बॉसनेही त्याला यासाठी प्रोत्साहन दिले होते. अजयने यापूर्वीही अशी तिकिटे खरेदी केली असली तरी अद्याप त्याचे नाव जॅकपॉटमध्ये आले नव्हते. आता त्याचे नाव जॅकपॉटमध्ये आल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अजयने सांगितले की, जेव्हा त्याने आपल्या कुटुंबीयांना जॅकपॉट जिंकल्याबद्दल सांगितले, तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. मात्र, आता बातम्यांमध्ये नाव आल्यानंतर सर्वांनाच याची खात्री पटली आहे.