पश्चिम बंगालच्या हिंसचारविरोधात भाजपचे देशव्यापी निषेध नोंदवणे चालू आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यासाठी भाजप कार्यकर्ते माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित आले होते.
पश्चिम बंगालमध्ये सध्या जे अराजक माजले आहे त्याचा जाहीर निषेध भाजप करत असून पश्चिम बंगाल मधली कायदा व सुव्यवस्था नष्ट झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घराची तोडफोड, प्राणघातक हल्ले, खून, महिलांवर अत्याचाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाली असून भाजप या विरोधात तीव्र देशव्यापी आंदोलने करत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत असल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली.
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमधून कायद्याचे राज्य हरवले असून कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. ममता दीदींनी आपला शब्द खरा करून दाखवत संरक्षण बळ कमी होताच हा हिंसाचार केला असल्याचा आरोप यावेळी महाजन यांनी तृणमूल काँग्रेस वर केला आहे.