जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यातील हिंगणा पिंपरी येथे शिवसेना युवसेना आणि महिला आघाडी शाखेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. रावेर लोकसभा विभाग उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील आणि महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम बऱ्हाटे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यत आले.
याप्रसंगी शहरप्रमुख अतुल सोनवणे विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, विश्वजित पाटील, भरत पवार, तुकाराम गोपाल, मुकेश काळे, सुरज चव्हाण, विलास शिंदे आदि उपस्थित होते.
हिंगणा पिंपरी येथे ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खालीलप्रमाणे शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शाखा प्रमुख – ईश्वर काळे, उपशाखा प्रमुख – दिनेश पाटील, अनिल काळे, भागवत पाटील, राजू पाटील, योगेश पाटील, प्रदीप काळे, कैलास काळे यांचा कार्यकारणीत समावेश आहे. यावेळी गावातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.