जळगाव: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अजिंठा चौक ते खोटे नगरपर्यंत लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट बंद असल्याने ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अजिंठा चौक ते कुसुंबा गावापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच नुकतेच तयार झालेल्या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासल्यानंतरच मक्तेदारचे बिल देण्यात यावे, अशा विविध समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
यांची होती उपस्थिती
यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, रहीम खाटीक, अशोक सोनवणे, सहील पटेल, रफिक पटेल , चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, खलील शेख, हितेश जावळे, साजिद पठाण, विशाल देशमुख आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी होते.