मुंबई : भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी इंजेक्शनद्वारे देण्यात येतात. त्यामुळे भारत बायोटेकने तयार केलेल्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसीच्या प्रतीक्षेत अनेकजण होते. नाकावाटे देण्यात येणारी ही लस देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी लस कशी काम करते आणि ती कुठे मिळणार आहे यासंदर्भात जाणून घेऊयात…
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. ही लस सोपी आणि सुरक्षित आहे. iNCOVACC लसीला सर्व नागरिकांसाठी खासगी लस सेंटरवर उपलब्ध केले जाणार आहे. परंतु याची लस घेण्यासाठी Covaxin आणि Covishield प्रमाणे स्लॉट बुक करावे लागणार आहे.
ऑनलाइन बुक करावा लागेल स्लॉट
नवीन नाकाद्वारे दिली जाणारी लसचा स्लॉट बुक करण्याची पद्धत आधीच्या प्रमाणे आहे. सर्वात आधी तुम्हाला CoWIN website किंवा app वर जावे लागेल. या ठिकाणी स्लॉट बुक करण्याचा ऑप्शन दिला जाईल. बुक करण्यात आलेल्या स्लॉट नुसार, सेंटरवर जावून तुम्हाला ही लस घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. नागरिकांना त्यांच्या मोबाइलच्या मदतीने लॉगिन किंवा रजिस्टर करण्याचा ऑप्शन दिला जात आहे.
लसीची किंमत किती?
भारत बायोटेकच्या नेजल वॅक्सीनची किंमत खासगी रुग्णालयांमध्ये 800 रुपये + 5 टक्के जीएसटी, शिवाय खासगी रुग्णालय यात आपले चार्ज जोडू शकतात. तर सरकार रुग्णालयात या लसीची किंमत 325 रुपये इतकी असणार आहे. सध्यातरी ही लस फक्त खासगी रुग्णालयांमध्ये आणि केंद्रांमध्येच उपलब्ध होईल.
कोणाला दिली जाणार ही लस?
भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला मंजूरी मिळाल्यानंतर ही लस 18 वर्षांवरील व्यक्तींना दिली जाणार आहे. 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही, त्या लोकांना ही लस दिली जाऊ शकते. या लसीचे दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्रत्येकी चार थेंब टाकायचे आहेत. तसेच 28 दिवसांनंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस उपलब्ध आहे. पण इंजेक्शनची भीती असलेल्यांनी ही लस घेतलेली नाही. त्यामुळे सरकारने नाकावाटे घेता येणारी लस उपलब्ध केली आहे.