जळगाव : शहरातील खोटे नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांचे बाळासाहेबांचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ही निवड झाली आहे. निलेश पाटील आक्रमक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे निलेश पाटील यांच्या रूपात शिंदे गटाला जिल्ह्यात एक आक्रमक चेहरा मिळाला असून त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे.
निलेश पाटील यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे असे दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेतील दुफळी वाढली असल्याचे चित्र आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटातील निलेश पाटील यांनी आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला असून त्यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेत असताना गाजली आंदोलन
निलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी अगोदर कामकाज पाहिले आहे. जिल्ह्यातील मराठा आणि आक्रमक चेहरा म्हणून निलेश पाटील यांची ओळख आहे. शिवसेनेत असताना त्यांनी अनेक आंदोलन केली होती. मात्र जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासोबत अनेकदा खटके उडाले होते. तेव्हापासून ते पक्षात काहीसे अस्वस्थ असल्याने त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेब यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.
गुलाबराव पाटलांची ताकदही वाढणार
शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाने वेगळा पक्ष स्थापन केला असून जळगाव जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी एका आक्रमक चेहऱ्याची पक्षाला गरज होती. त्यात निलेश पाटील हे शिवसेनेत असताना त्यांनी अनेक आंदोलना केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मराठा तसेच एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिंदे गटाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता मराठा चेहरा म्हणून निलेश पाटील यांचा पक्षाला नक्कीच फायदा होईल निलेश पाटील यांच्यामुळे गुलाबराव पाटलांची ताकदही वाढली आहे.