मुंबई : आजकालच्या काळात गेम्स खेळणाऱ्या तरुणांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. काही जण चक्क दिवसभर बसून गेम्स खेळत असतात. यामुळे पालक त्रस्त असतात. मात्र आता गेम्स खेळून करिअर बनवता येणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या येणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आता शाळा, महाविद्यालयांमध्ये गेमिंगवर अभ्यासक्रम सुरु करणार आहे.
केंद्र सरकारच्या कृती दलाने सादर केलेल्या अहवालानुसार, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्रात पुढील 8 वर्षांमध्ये 20 लाख नव्या रोजगाराची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार शाळेपासून महाविद्यालयीन पातळीवर या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केले जावेत. तसेच ‘क्रिएट इन इंडिया (भारतातच निर्मिती) मोहिमेंतर्गत भारतीय कंटेट निर्मिती करणाऱ्यांना सरकारच्या वतीने तांत्रिक व अर्थसाहाय्य केले जावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशींवर लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्राने स्पष्ट केले.
जगभरात 3 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ
कृती दलाचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी आपला अहवाल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना सादर केला आहे. चंद्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, एव्हीसीजी क्षेत्रात जगभरातील बाजारपेठ 3 अब्ज डॉलर्सची म्हणजे सुमारे 22.78 लाख कोटी रुपयांची आहे. यामध्ये भारताचा वाटा सध्या 24,855 कोटी रुपये आहे. सन 2020 पर्यंत या क्षेत्रात भारतात 20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो,असे चंद्रा यांनी सांगितले.
12वी नंतर गेमिंग कोर्स
बारावीनंतर गेमिंग इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी तुम्ही हा टॉप कोर्स करू शकता. तथापि, आपण आपल्या आवडीनुसार आणि भविष्यातील योजनेनुसार अभ्यासक्रम निवडणे चांगले आहे. जाणून घेऊया या मधील काही महत्त्वाचे कोर्सेस.
– बी.एस्सी. ॲनिमेशन आणि गेमिंग मध्ये
– ॲनिमेशन गेम डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर ऑफ सायन्स
– ॲनिमेशन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए)
– डिजिटल फिल्ममेकिंग आणि ॲनिमेशनमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए).
– ग्राफिक्स, ॲनिमेशन आणि गेमिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc.).
गेमिंग उद्योगातील प्रमुख करिअर पर्याय
गेमिंग इंडस्ट्रीमध्ये कोणताही कोर्स केल्यानंतर, तुम्हाला मुख्यतः या क्षेत्रात (गेमिंग कोर्सेस) नोकरी मिळू शकते. आजकाल या उद्योगातील करिअर पर्यायांना खूप मागणी आहे.
– गेम ॲनिमेटर
– गेम निर्माता
– ऑडिओ अभियंता
– क्रिएटिव्ह डायरेक्टर
– गेम डिझायनर
– गेम प्रोग्रामर
– गेम आर्टिस्ट
– प्रमुख कलाकार
– गेमिंग रायटर
– गेम टेस्टर