जळगाव : अमळनेर तालुक्यातील मारवड येथून चाेरी केलेल्या 918 किलाे वजनाच्या 17 लाेखंडी प्लेटा कारमधून घेवुन जाणाऱ्या चाैघांना जिल्हापेठ पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून चाेरीच्या लाेखंडांसह कार पाेलिसांनी जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार पोलिस हवालदार गणेश पाटील व पोलिस शिपाई समाधान पाटील यांना मानराज पार्क या ठिकाणाहून एमएच 19 क्यू 4760 ही निळ्या रंगाची टाटा इंडिका गाडी संशयितरित्या भरधाव वेगात जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबवून अधिक चौकशी केली.
आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
टाटा इंडिका गाडीमध्ये लोखंडी प्लेटा व चार जण हाेते. गाडीमधील लोखंडी प्लेटां हाेत्या. त्या कुठे घेवुन जाताय याबाबत अधिक चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणून पाेलिस हिसका दाखविल्यावर त्यांनी त्यांची नावे ज्ञानेश्वर सोपान कोळी (वय 27), मिथुन निरामन गोसावी (वय 36), लखन एकनाथ सपकाळे (वय 30), विष्णू श्रीधर कोळी(वय 37) सर्व राहणार शेळगाव तालुका जिल्हा जळगाव अशी माहिती समाेर आली. या कारमध्ये असलेल्या 918 किलाे वजनाच्या 17 लोखंडी प्लेटा 918 किलो वजनाच्या या कळमसरे मारवड तालुका अमळनेर येथून चोरी केले असल्याची कबुली त्यांनी दिली.
मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मारवड पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता, याबाबत चोरीचा गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळाली. चोरांकडून मुद्देमाल तसेच त्यांच्या ताब्यातील वाहन मोटर इंडिका कार मारवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई एपीआय किशोर पवार, पीएसआय गणेश देशमुख, हवलदार गणेश पाटील, शिपाई समाधान पाटील व विनोद पाटील यांनी केली आहे.