मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीचे 2 मार्चपासून सुरू होणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 19 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते.
या संकेतस्थळावर पहा संपूर्ण वेळापत्रक
दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
बारावी, दहावीच्या लेखी परीक्षा कालावधी :
परीक्षा : कालावधी
बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) सर्वसाधारण व दिलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023
दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) : 2 मार्च ते 25 मार्च 2023