अमळनेर : जिल्ह्यात शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यानंतर नवीन कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढली आहे. आता अमळनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक संजय पाटील(भूत बापू), सुन्दरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते साखरलाल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर शहरातील बंगाली फाईल स्टेशन रोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे माजी तालुकाप्रमुख भरत पवार यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यांनी केला प्रवेश
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमधे सूरेश सोनवणे, आप्पा पाटील, किशोर ठाकुर, योगेश कदम, गोपीचंद उजागरे, घातक खाटीक, आकाश महाले, पिंटू मोरे, सिद्धेश्वर लकपटे, शाकीर पठाण, गणेश टरले, भूषण पाटील, मूकेश साळुंखे, दर्शन गायकवाड, पंकज उबाळे, राहूल शिंदे, रईस शेख आदिंचा समावेश होता. यावेळी वसंत महाजन सर , राजेश महाजन आदि उपस्थित होते.