नागपूर : नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या फोन करून ही धमकी दिली. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी नेमकी कुणी दिली याची चौकशी सुरु केली आहे. नागपूर पोलीस यामुळे सतर्क झाले आहेत.
फोन कुणी केला पोलिसांकडू शोध सुरु
पोलीस नियंत्रण कक्षाला दुपारी 1 वाजता निनावी फोन आला. निनावी फोनवरुन संघ मुख्यालय उडवण्याच्या धमकीचा फोन आला. निनावी फोनद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी या फोन नंतर तातडीनं पावलं उचलली आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाला सीआयसएफकडून सुरक्षा देण्यात आलेली आहे. मुख्यालयाच्या बाहेरच्या बाजूला नागपूर पोलिसांकडून सुरक्षा देण्यात येते. नागपूर पोलिसांनी यामध्ये वाढ केली आहे. सुरक्षेत वाढ करण्यात आली. तपासणी करण्यात आली. आरोपीचा शोध सुरू आहे.