जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राज्यात बीएचआर प्रकरण गाजत असताना तर दुसरीकडे केंद्रातील पथक जिल्ह्यात धडकणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे, यासाठी अधिक माहिती घेतली असता एका माजी आमदाराची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे, बेकायदेशीर संपत्ती व विविध बँक खात्यात ठेवलेली बेहिशोबी मालमत्ता व रकमेची चौकशी होणार आहे. प्रकरणात अनेक दिग्गज अडकण्याची भीती देखील वर्तवण्यात आली असून यासाठी पथके जिल्ह्यात ठाण मांडून बसणार असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतून मधून आले आहे. यासाठी एकाच वेळेत त्या माजी आमदाराच्या विविध संस्था ,घर, ऑफिस , फार्महाउस या ठिकाणी हि पथके धडकण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी कळविले आहे.
जिलह्यात आणखी काही राजकीय लोकप्रतिनिधी केंद्रातील या पथकांच्या रडारवर असण्याची शक्यता आहे, कारण बीएचआर प्रकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यहार झाल्याचे समोर आले आहे, या आधीच बीएआर प्रकरणात अनेक दिग्गज उद्योजक व राजकीय लोकप्रतिनिधी , सहकार क्षेत्रातील दिग्गज यांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील पथके आजी-माजी लोकप्रतिनिधीं यांच्या मालमत्तेची चौकशी करीता जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा अनेकांना धडकी भरवणारी आहे.
बीएचआर प्रकरणात माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या अनेकांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करीता ताब्यात घेतेले असून त्यांची कसून चौकशी पुणे येथे करण्यात येत आहे, यामध्ये आज ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असून या प्रकरणी पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.