जळगाव : जळगाव जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना सक्रिय झाली असून जिल्हा तसेच तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना अल्पसंख्यांक कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीत तालुकाप्रमुख पदी मो.सलीम मो. इसाक यांची तर उपतालुका प्रमुखपदी एजाज कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरप्रमुखपदी मुस्ताक बेलदार, उपशहरप्रमुख नसीर मोमीन, उपशहर प्रमुख फाकरुद्दिन कबिरुद्दिन मोमीन, उपशहर प्रमुख आसिफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना प्रवेश करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मो. सलीम शे. इसाक, फकरोद्दीन कबीर मोमीन, नासीर अहमद इकबाल अहमद मोमीन, ऐजाज खान अशरफ खान कुरेशी, अ. करीम शे. शाह मोहम्मद, अ. हफीज, आबीद अहमद, इरफान पठाण, मो. रेहान मो. कासीम, आफताब सईद मोमीन, मो. शकीर मो. सईद, हुसनोद्दीन मोमीन, असलम मोमीन, मुज्जमील रयाज, मो. नवाज मो सलीम, तौफक रजा मोमीन, यासीन मोमीन, दानिश मोमीन, गुलाम निजामोद्दीन, दानिश मोमीन उपस्थित होते.