मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात महाराष्ट्रातून अनेकांना डच्चू. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार आणि फेरबदल होणार असल्याचे राजकीय संकेत मिळाले असून या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून भारतीय जनता परतीच्या काही दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विस्तारत राज्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती मात्र अचानक दिल्लीकरांच्या यादीतून त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.
नवी दिल्लीत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. बैठकीत नारायण राणे यांच्या नावाचा विचार देखील झाला नसल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. एका जबाबदार असलेल्या राजकीय नेत्याने सांगितले की, या यादीतून महाराष्ट्रातून एका मंत्र्याला डच्चू दिला जाऊ शकतो तर एका मंत्र्या कडून खाते काढून घेण्यात येणार आहे. बैठकीत प्रामुख्याने भाजपच्या नऊ सदस्यांच्या नावांचा विचार झाला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलात संभाव्य नाव या प्रमाणे.
ज्योतिरादित्य शिंदे (म.प्र), सर्बनानंद सोनवाल (आसाम), सुशील मोदी (बिहार), त्रिवेंद्र सिंघ रावत (उत्तराखंड), दिनेश त्रिवेदी (पश्चिम बंगाल), भूपेंद्र यादव (राजस्थान), अश्विनी वैष्णव (ओडिशा), वरून गांधी(ऊ.प्र), जम्यांग शेरिंग (लडाख). यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.