रावेर : रावेर पंचायत समितीत मधील बहुचर्चित शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी २२ आरोपींकडून सुमारे ५० लाख रुपये जमा झाल्याची माहिती तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी दिली.
रावेर पंचायत समिती मधील बहुचर्चित शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरण महाराष्ट्राभर गाजत आहे. आतापर्यंत रावेर पोलिसांनी सुमारे २२ आरोपींकडून ५० लाख रुपये जमा केले असुन पुढील काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी दिली आहे. तर काही दिवसांपूर्वी रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी वकीलासह पोलिस स्टेशनला या शौचालयच्या गुन्हा संदर्भात भेट दिल्याने एकच चर्चा आहे.