मुंबई : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
आयोगाने (SSC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार टियर I (SSC CHSL टियर I परीक्षा 2022) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येईल. महत्त्वाच्या तारखा, पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार इत्यादी तपशील येथे पाहता येतील.
एकूण पदे : 4500
या पदांसाठी होणार भरती
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 4500
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज फी :
सामान्य, OBC आणि IWBS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर सर्व श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. पहिल्या वेळी दुरुस्ती शुल्क 200 रुपये आणि दुसऱ्या दुरुस्तीसाठी 500 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
किती पगार मिळेल?
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA): वेतन स्तर-2 (रु. 19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO): वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100) आणि स्तर-5 (रु. 29,200-92,300).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘ए’: वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2023 (11:00 PM)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा https://ssc.nic.in/