जळगाव: शहरात पोलीसांच्या मेहरबानीमुळे अनेक अवैध धंदे जोमात सुरू झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये उघडपणे अवैध सट्टा, पत्ता सुरू आहे. खाजगी पंटरांच्या माध्यमातून हप्ते वसुली केली जात असल्याची चर्चा रंगत आहे. तरुणाईला अधिक आकर्षण अवैध व्यवसाचे जडले आहे, सहज उपलब्ध होणारा पैसा यामुळे तरुणाईचा कल अवैध धंद्यांकडे अधिक वाढला आहे.
अवैध धंद्यांमध्ये विनापरवाना देशी, विदेशी दारू सह गुटखा, मटका व जुगार अड्डयांचा समावेश आहे. परिसरातील अल्पवयीन व शाळा कॉलेज मधील तरुण या अवैध्य व्यवसायामुळे व्यसनाधीन होत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. या अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीसांचा कोणताही वचक राहीला नसुन पोलीसांच्या हप्तेखोर धोरणामुळे सामन्य माणुस त्रास होत असतांनाही कोणतीही तक्रार करू शकत नाही.
पोलिसांचे होतेय दुर्लक्ष
शहरातील विनापरवाना खुलेआम देशी व विदेशी दारुची विक्री होते. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले दारुच्या व्यसनी गेले आहेत. परिसरात सर्रास गुटख्याची विक्री होत असून याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकजन विनापरवाना अवैध देशी व विदेशी दारू विक्री करीत आहेत. याकडे स्थानिक पोलीस जानिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड परिसरातील नागरीकांधून होत आहे.
तरुण पिढी होतेय व्यसनाधीन
अवैध धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून आर्थिक कमाई व्यसन व जुगारात उडवत आहे. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी वाढुन दुकान फोडणे, मोटारसायकल चोरी करणार्या नवीन टोळ्या उदयास येत असल्याने सामान्य नागरिक व व्यवसायिक हताश झाले आहे. आठवडाभर मजुरी केलेली कमाई सुटीच्या दिवशी सोरट मटक्यावर लावून हताश झालेला तरुण देशी पिऊन रस्त्याच्याकडेला खिसा रिकामा करून पडलेला असतो. नागरिकांच्या आरोग्यास घातक गुटखा या परिसरात ट्रकने गोडावूनमध्ये उतरवून किराणा दुकान, पान टपरी यांना पोहच केला जातो.