मुंबई: भारतीय रेल्वेने ॲप्रेंटीसच्या एकूण 7,914 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी संबंधित रेल्वे झोनच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या जागा दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) विभागात रिक्त आहेत.
रेल्वेने दिलेल्या अधिसूचनेनुसार, दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4,103 जागा, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये 2,026 आणि उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 1,785 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्जाची माहिती 30 डिसेंबरलाच देण्यात आली. इच्छूक उमेदवार scr.indianrailways.gov.in, rrcser.co.in आणि rrcjaipur.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
पात्रता निकष काय आहे?
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत 10 वी) पदवी आणि मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह आणि ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: विभागाने विहित केलेली वयोमर्यादा अशी आहे की अर्जदारांनी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 15 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि त्यांचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव उमेदवारांसाठी वयात सवलत आहे.
निवड कशी होईल?
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीवर आधारित असेल. मॅट्रिकमधील किमान 50% गुण आणि ITI ट्रेडमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. अर्जाची प्रक्रिया 10 जानेवारी 2023 पासून सुरू होईल आणि उमेदवार 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत फॉर्म भरू शकतील.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज – 30 डिसेंबर 2022 पासून सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2023
दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2023
ऑनलाइन अर्ज- 3 जानेवारी 2023 पासून सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 2 फेब्रुवारी 2023
उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023
ऑनलाइन अर्ज – 10 जानेवारी 2023 पासून सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
रिक्त जागांचा तपशील
– दक्षिण मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी रिक्त जागा-4103
– दक्षिण पूर्व रेल्वे प्रशिक्षणार्थी रिक्त जागा – 2026
– उत्तर पश्चिम रेल्वे प्रशिक्षणार्थी रिक्त जागा-1785