औरंगाबाद : लग्नात मेजवानीतू तब्बल सातशे वऱ्हाडींना विषबाधा झाल्याती धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. लग्नात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडींची प्रकृती बिघडल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांवर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली आहे. जेवणानंतर पाहुण्यांना काही वेळातच उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरु झाला. त्यांना तात्काळ परिसरातील एमजीएम तसेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्विट डिशमधून विषबाधा
विवाहात पाहुण्यांसाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुण्यांनी त्रास सुरु होताच स्वत:हून रुग्णालयात धाव घेतली.