जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर येथील चिंचखेडा पाझर तलावा तलावाजवळील विकास कामांसाठी असलेली आठ ते दहा डंपर रेती वाळू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ माजली आहे. २०१८-१९ दरम्यान आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पाझर तलावाचे उद्घाटन करण्यात आले होते. या तलावाजवळ विकास कामांसाठी दोन वर्षांपासून आठ ते दहा डंपर रेती वाळू साठा करण्यात आलेला होता. मात्र या वाळूची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून चिंचखेडा तवा ग्रामस्थांनी याबाबत चौकशी करून चोरट्यांवर लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी केली आहे.
दरम्यान पाझर तलावाजवळील वाळू साठा अचानक पणे चोरीस गेल्यामुळे विकास कामे थंडावली असून ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आधीच बांधकाम थंड बस्त्यात पडून होते परंतु गिरीश महाजन यांनी उद्घाटन केल्यानंतर कामाला गती आली. त्यामुळे तलावाचे बांधकाम लवकर पूर्ण होऊन विकासकामांना चालना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांची असतांना, ही वाळूची चोरी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि तहसीलदारांनी चोरीस गेलेला वाळू साठा प्रकरणातील चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.