जळगाव: जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. काही रस्त्यांची कामे शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केली आहेत. मात्र, अद्यापही रस्त्यांची कामे होत नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. याविरोधात मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूरज विजयराव नारखेडे यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सूरज नारखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा करुन रस्त्यांच्या कामांना गती देण्याची मागणी केली आहे. शहरात रस्त्याची कामे सुरू व्हावे म्हणून याबाबत शहरामध्ये बॅनर लावून सतर्कतेचा इशारा दिलेला होता. परंतु आता या रस्त्यावर सतत दोन आठवड्यांपासून अनेक लोकांचे अपघात होत आहेत. काल रात्री एका विद्यार्थ्याच्या पायात रॉड घुसला, यामुळे आता संतापाची लाट निर्माण झाली आहे.
रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
जुने जळगावमधील नेरी नाका व झाशीची राणी पुतळा चौक ते काऊ कोल्हे विद्यालय पर्यंतचा रस्ता भूमीपूजन होऊनही कामास दिरंगाई का? याबाबत नागरिकांचे हाल होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याची सूरज नारखेडे यांनी जाब विचारला. याबाबत अधिक्षक अभियंता यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामधील काही ठळक गोष्टीचा खुलासा केला. याबाबत नारखेडे यांनी पुन्हा रस्ता रोकोचा इशारा अधिक्षक अभियंता यांना दिलेला आहे. याबाबत त्यांनी याबाबत त्यांची मीटिंग घेऊन त्वरित याबाबत मार्गी लावतो अशे आश्वासित केले. कोणतेही कामे सुरू न झाल्यास आता सरळ रास्ता रोको आंदोलन व लाक्षणिक धरणे करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सूरज नारखेडे यांनी दिला आहे.