जळगाव : अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत, मात्र आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. यावेळळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत सुद्धा आमच्यावर टीका करत आहेत, महापुरुषांबद्दल काहीतरी बोलता येतं, मात्र मी खोलात जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसता, आडवा पडला असता, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. संजय राऊतांना जी 41 मते पडले ना ते असं केल्यामुळे पडले हे सांगताना गालावर हात ठेवून मंत्री गुलाबराव पाटील यांनी नक्कल करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.
लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोगतात म्हणजे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा
आम्ही कोणत्या धर्मकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण आमच्या धर्माकडे कोणी वाकड्यांना नजरेनं बघत असेल तर आम्ही काही गांधींजी नाही की.. या गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा असं ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले. इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा हे मी विधानसभेत ओवेसीच्या कुत्र्यांना सांगितल्याचंही म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ओवेसी यांच्यावर एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली.
खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा
दरम्यान पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. मी मंत्री आहे की आमदार आहे यापेक्षा आम्ही हिंदू आहोत. खुर्ची देणारे पण तुम्हीच खुर्ची उडणारे पण तुम्हीच त्यामुळे धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.