जळगाव : शहरातील तपस्वी हनुमान मंदिरात अनेकवर्ष वास्तव्य असलेल्या आणि हजारो भाविकांचे आस्था असणारे महंत सरजूदास महाराजांना राजस्थानच्या भिलवाडा पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
भिलवाडा येथील घोडास आश्रमात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आणि तिच्या आईवर ॲसिड हल्ला केल्याचा सरजूदास यांच्यावर आरोप आहे. सरजूदासचे आश्रम जळगाव, बद्रीनाथ व अयोध्या येथे आहेत. जळगावच्या शाहूनगर हनुमान मंदिरात सरजूदासचे शिष्य बालकदास यांच्याकडे शुक्रवारी भिलवाडा पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे जळगावात आढळून आले.
पाच आश्रमांचा प्रमुख
सरजूदास महाराज भिलवाडाच्या घोडास डांग येथे पाच आश्रमांचा प्रमुख आहे. देशभरात त्याचे शेकडो भक्त आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अटक करण्यात आली. दोन वेळेस गुन्ह्याच्या तपासाधिकारी तथा पोलिस अधीक्षक चंचल मिश्रा यांनी संशयित सरजूदास यांची पोलिस कोठडी मिळविली आहे.
मुलीसोबत माेबाइलवर चॅटिंग
जळगावातील एका अल्पवयीन मुलीसोबत माेबाइलवर चॅटिंगनंतर सरजूदासचे संबंध समोर आले. त्यामुळे हे प्रकरण आता जळगावपर्यंत येऊन पोहोचले आहे. सरजूदासचे शिष्य म्हणवणारे बालकदास महाराज हे शाहू नगरातील हनुमान मंदिराचे प्रमुख आहेत. भिलवाडा पोलिसांनी शुक्रवारी जळगावात येऊन बालकदास महाराज यांची चौकशी केली. चौेकशीसाठी बालकदास यांना ताब्यात घेतले आहे.