मुंबई : आजकाल घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आले आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक एकमेकांशी संपर्क साधने सोयीचे झाले असून अनेक व्यवहार देखील काही मिनिटात होऊ लागले आहेत. याचा फायदा असला तरी काही तोटेही समोर येऊ लागले आहेत. मोबाईल हॅक करून अनेक फसवणुकीचे प्रकार सध्या उघडकीस येत आहेत. त्यामुळे तुमच्याही मोबाईलमध्ये असे काही बदल जाणवू लागल्यास, लागलीच सतर्क होऊन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे.
अनेकदा कामानिमित्त युजर्स त्यांची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करतात. पण, ही माहिती सुरक्षित नसली तर मोबाईल हॅकिंगचा धोका सुद्धा वाढतो. त्यामुळे फोनमध्ये हॅक झाल्यावर नक्की कोणते बदल होतात याबद्दल माहिती जाणून घ्या.
इंटरनेट डेटा लवकर संपणे
जर तुमच्या फोनचा इंटरनेट डेटा लवकरच संपत असेल तर, तुमच्या स्मार्टफोनमध्ये हॅकिंगचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. हे घडते कारण, हॅकिंग किंवा Malicious Apps डेटा लवकर संपवतात यामध्ये धोकादायक कोडिंग उपलब्ध असते.
अकाऊंट लॉगिन नोटिफिकेशन्स
जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुमच्या अकाऊंट लॉगिन नोटिफिकेशन्स मिळत असतील तरी, देखील सावध राहणे गरजेचे आहे. अशात तुमचा मोबाईल हाक झालेला असू शकतो. तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमच्या कोणत्याही Social Media App वर चॅट मेसेज आपोआप सीन दिसत असतील, तर तुमचा स्मार्टफोन हॅक झाल्याची शक्यता आहे.
बॅटरी लवकर डाऊन होणे
फोनमध्ये अचानक बॅटरी संपण्याची घटना अनेक वेळा पाहायला मिळते. हे धोकादायक App आणि मालवेअरमुळे घडते. त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर, समजून घ्या की तुमचा स्मार्टफोन आणि त्यातील डेटाचा धोका आहे. अनेक वेळा युजर्सना त्यांचा फोन हॅक झाल्याचेही कळत नाही. हॅकर्स तुमचा सर्व वैयक्तिक डेटा चोरून त्याचा गैरवापर करू शकतात.
अनोळखी कॉल – मेसेजेस वाढणे
एखाद्या अनोळखी नंबरवरून तुम्हाला OTT मागणे यासारख्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असेल, तर समजा तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे. अशा स्थितीत फोनवरून बँकिंग व्यवहारासारखे काम थांबवलेलेच बरे. तसेच, फोन आणि इतर वैयक्तिक गोष्टी सुरक्षित फोल्डरमध्ये ठेवा. आणि अशा घटनेची तक्रार करा. तसेच, मोबाईल स्क्रीन बंद करूनही Apps काम करत असतील तर काळजी घ्या. फोनचे सेन्सर पुन्हा- पुन्हा डिटेक्ट होणे हे देखील मोबाईल हॅकिंगचे लक्षण आहे.