भुसावळ : कोपरगाव ते कान्हेगांव दरम्यान एन आय आणि नॉन एन आय आणि डबल लाईन यार्ड रिमॉडेलिंगचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून 3 ते 24 जानेवारील काळात ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण होणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेत महत्वपूर्ण काम केले जात असल्याने ब्लॉक घेतला आहे, यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रद्द असलेल्या गाड्यामुळे प्रवाशांना त्यांचे तिकीटाचे पूर्ण रक्कम परत मिळणार आहे, ज्यांनी ऑनलाईन तिकीटे काढलेली आहे, त्याच्या बॅक खात्यात ही रक्कम परत जाणार आहे. तर ज्यांनी तिकीट खिडकीवरून तिकीट काढलेले आहे, त्यांना तिकीट खिडकीवरूनच तिकीटाची रक्कम मिळणार आहे.
रद्द झालेल्या गाड्या
गाडी (22147) दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दि. 6 ते 13 व 20 जानेवारी या काळात रद्द केली आहे. तर गाडी (22148), साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस ही गाडी 7 ते 14 जानेवारी व 21 जानेवारीला रद्द केली आहे. तसेच गाडी (12131) दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही गाडी दि. 23 जानेवारीला रद्द आहे. गाडी (12132) साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस ही गाडी 24 जानेवारीला रद्द केली आहे. गाडी (01135) भुसावळ – दौंड मेमू गाडी दि. 5 ते 12 जानेवारी व 19 जानेवारीला रद्द आहे. गाडी (01336) दौड-भुसावळ मेमू गाडी दि. 5 ते 12 व 19 जानेवारीला रद्द केली आहे. गाडी (11039) कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी 21, 22, 23 जानेवारीला रद्द केली आहे. तर याच तारखेला गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी रद्द आहे. सलग तीन दिवस महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.