जळगाव : चाळीस हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीतील उर्वरीत विस हजाराची रक्कम स्विकारणा-या शिंदखेडा भुमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपीकास जळगाव एसीबी पथकाने आज रंगेहाथ पकडले. त्याला धुळे शहर पोलिस स्टेशनला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे पोलिसांच्या ताब्यात त्यास देण्यात आले आहे. सुशांत शामप्रसाद अहिरे असे जळगाव एसीबी सापळा पथकाच्या हाती आलेल्या छाननी लिपीकाचे नाव आहे.
सुशांत अहिरे उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा येथे कार्यरत आहे तर तक्रारदार हा जळगाव संभाजीनगर परिसरातील रहिवासी आहे. तक्रारदाराने बेटावद गावातील शेतजमीन गटाच्या पोट हिस्सा मोजणीसाठी अती तातडीचे चलन भरुन अर्ज सादर केला होता. या कामासाठी छाननी लिपीक सुशांत अहिरे याने तक्रारदाराकडून 11 नोव्हेंबर 2022 रोजी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्याच दिवशी विस हजार रुपयांची आगावू रक्कम स्विकारली होती. उर्वरीत विस हजाराची रक्कम स्विकारतांना त्यास आज रंगेहाथ पकडण्यात आले. उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय धुळे येथे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
यांनी केली कारवाई
एसीबीचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव तसेच पो.नि.संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हे.कॉ.अशोक अहिरे, पो.ना. ईश्वर धनगर, बाळू मराठे, पो.ना. महाजन, पोकॉ.अमोल सूर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकूर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.