पाचोरा : एकनाथ शिंदे कालही, उद्याही कार्यकर्ता होता आणि कार्यकर्ता म्हणून काम करतो. आपला माणूस म्हणून जनता मला पाहते. हीच आमच्या कामाची पोहच पावती आहे. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही राज्य आर्थिक सक्षम करण्याच्या योजनांना प्राधान्य दिले जात आहे. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर तो मैं अपने आप की भी नहीं सुनता, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे चामुंडा माता मिशन संचलित अखिल भारतीय बडगुजर समाजाच्या वतीने बडगुजर समाजाचे महा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी चामुंडा माता व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून घणाघाती भाषणाची सुरुवात केली. नुकतेच हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्त होतो. यातून मुक्त झाल्यानंतर सातारा येथील माझ्या गावात गावकऱ्यांनी कार्यक्रम घेतला होता. आमदार किशोर पाटील व बडगुजर समाजाने कार्यक्रमास येण्याचा आग्रह केला होता.
एकदा शब्द दिला की फिरवत नाही
गणपती नवरात्र व गोकुळाष्टमी दिवाळी सारखे सण व उत्सव जनतेने उत्साहाने साजरे केले आम्ही पण ३० जूनला मोठी दहीहंडीचा फोडल्याचा टोला लगावला. सर्व सणांवरचे निर्बंध हटवून मोकळ्या वातावरणात लोकांनी सण आनंदात साजरे केले. दिवाळीला १०० रुपयात फराळाचे साहित्य देखील राज्य सरकारने वाटप केले. समाज छोटा असला तरी माणसं मोठी असतात. मी एकदा शब्द दिला की तो फिरवत नाही आणि दिलेला शब्द पाळतो म्हणून ५० लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला.
30 हजार पाणीपुरवठा योजना राबविणार
बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही राज्याचा कारभार करीत आहोत. सर्वसामान्य आणि शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही असा प्रश्नही उपस्थित केला. बळीराजा शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याचे आयुष्य बदलले पाहिजे. हे सरकार सर्व सामान्य घटकांचे आहे सरकार स्थापन केल्यानंतर शेतकरी, कष्टकरी आणि मागील सर्व प्रलंबित प्रश्न लावून लोकहितांचे निर्णय हे सरकार घेत आहे ऐतिहासिक अश्या तीस हजार पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला.