मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सहाय्यकारी परिचारिका या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत BMC ने अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी पासून सुरुवात होणार असून 25 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने सहाय्यकारी परिचारिका प्रसविकेचे 421 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
सहाय्यकारी परिचारिका प्रसविका पदावर भरती झाल्यानंतर 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रं आवश्यक
– बायोडेटा
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो
या पत्त्यावर करा अर्ज
मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई- 400 012