मुंबई : ग्रामपंचायत असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो निवडणुकीनंतर उमेदवाराला निवडणुकीच्या खर्चाचा तपशील भरावाच लोगतो. हा तपशील भरला नाही तर उमेदाराला पुढची निवडणूक लढता येत नाही. मात्र ऑनलाइन खर्च विवरण भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाइन खर्च भरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या निर्णयामुळे ग्रामपंयत उमेदवारांचा निवडणूक खर्च भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला त्याने निवडणुकीत केलेल्या खर्चाचे तपशील ऑनलाइन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. शिवाय निवडणूक झाल्यापासून एका महिन्याच्या आत हा खर्चाचा तपशील ऑनलाईन भरावयाचा आहे.
वेबसाईटवर येत होत्या अडचणी
18 डिसेंबर 2022 रोजी राज्यभरातील जवळपास 7 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर एका महिन्याच्या आत या निवडणुकीच्या खर्चाचा तपशील ऑनलाईन भरणे बंधनकारत होते. परंतु, हा खर्च भरण्याची वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने उमेदवारांपुढे मोठा प्रश्न उभा होता. मात्र, राज्य निडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने खर्चाचा तपशील भरण्याचे आदेश दिले आहेत.
…तर निवडणूक लढवता येत नाही
मतदान झाल्यापासून एक महिन्याच्या आत निवडणूक लढलेल्या प्रत्येक उमेदवाराने त्याचा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सादर केला नाही तर त्यांच्यावर या पुढची निवडणूक लढण्यास बंदीची कारवाई होऊ शकते. हा तपशील ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. परंतु, हा तपशील भरत असताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हा खर्च ऑफलाईन भरण्याचे आदेश दिल्यामुळे उमेदवारांपुढील मोठी चिंता मिटली आहे.