जळगाव : महापालिकेच्या आयुक्त पदावरून सुरू असलेला वाद सध्यातरी सुटण्याची चिन्हे दिसत नाही. आयुक्त विद्या गायकवाड ह्या मॅटमध्ये गेल्याने सध्या मॅटच्या न्यायालयामध्ये आयुक्त पदाचा कायदेशीर वाद सुरू आहे. त्यामुळे आयुक्त पदाची सुनावणी आज 13 जानेवारीला होणार होती. मात्र न्यायाधीश यांची तब्येत बरी नसल्याने ही सुनावणी पुढे लोटली आहे.
आयुक्त पदाची आज सुनावणी होती. मात्र न्यायाधीश यांचा अपघात झाल्यामुळे त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे आयुक्ताची मॅट मधील पुढील सुनवणी तीन दिवस लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता आयुक्ताची मॅट मधील पुढील सुनवणी 16 जानेवारीला सकाळच्या सत्रामध्ये कामकाज होणार आहे.
दोन आयुक्तांमुळे वाढला गोंधळ
गेल्या अनेक दिवसापासून जळगाव महापालिकेत आयुक्त पदाच्या खुर्चीवरून राजकीय हस्तक्षेप वाढल्याने वाद सुरू आहे. महापालिकेत सध्या दोन आयुक्त आहेत. यामध्ये देविदास पवार व विद्या गायकवाड यांच्याकडे कायदेशीर कारभार आहे. मात्र दोघांनाही प्रशासकीय कारभार चालवण्याचे कुठलेही अधिकार नाहीत.
शहर विकासावर परिणाम
या सर्व घडामोडींमुळे शहर विकासावर परिणाम होत आहे. आयुक्त विद्या गायकवाड या सध्या जळगाव ठाण मांडून आहेत. तर देविदास पवार देखील महापालिकेच्या आयुक्त पदावर कायम आहेत. मात्र महापालिकामध्ये चाललेल्या सुरळीच्या काळात दोघेही सध्या तरी जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदावर कायम आहेत.