मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्करातील 191 पदं काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
भारतीय लष्करानं जारी केलेल्या भरती मोहिमेद्वारे, भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि इतर विहित पात्रता असणं आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 20 वर्ष आणि पदानुसार कमाल वय 27/35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
जाणून घ्या निवड प्रक्रिया
भारतीय लष्करानं जारी केलेल्या भरती प्रक्रियेतील पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया / SSB मुलाखत / वैद्यकीय चाचणी आयोजित केली जाईल. एसएसबी मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
अर्जासंदर्भात महत्त्वाच्या तारखा
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 जानेवारी 2023
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023
– पोस्टानं अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
– आधार कार्ड
– कास्ट सर्टिफिकेट
– पासपोर्ट फोटो
– ईमेल आयडी, मोबाईल नंबर
– मार्कशीट
अर्ज करण्याची प्रक्रिया
अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी उमेदवार 09 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. याशिवाय, उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.