जळगाव: यापूर्वी भाजपामधून बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी महापालिकेत महापौर निवडणूकीच्या दरम्यान शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. यामध्ये एकूण 27 नगरसेवकांचा समावेश होता मात्र पुन्हा शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकूण सात नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यामध्ये आणखी दोन नगरसेवक व नगरसेविका पुत्राचा समावेश झाला आहे.
महापालिकेचे राजकारण सध्या संभ्रम अवस्थेत झालेले आहे. नेमके कोण कोणत्या गटासोबत याबाबत अधिकारी देखील चक्रावले आहेत. निधी तसेच होणाऱ्या राजकीय अडचणी अभावी नगरसेवक ह्या न त्या गटात बंडखोरी करीत प्रवेश करीत आहे. आता किशोर बाविस्कर, मनोज आहुजा, उमेश सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मनपाचे राजकारण झाले अस्थिर
जळगाव महापालिकेचे राजकारण सध्या अस्थिर झालेले आहे. यामुळे शहराच्या विकासाला देखील बाधा झालेली आहे. शिंदे गटात गेलेले नगरसेवक जळगाव शहराच्या विकाससात्मक भूमिकेत किती प्रभावी ठरतात हे आता येणारे वेळ ठरवणार आहे. शिंदे गटात गेल्याने नेमके नगरसेवकांनी त्यांच्या पारड्यात काय पाडले? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.