रावेर(प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहीतेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केला म्हणून रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की दि १३ रोजी रावेर तालुक्यातील एका खेडया वरील रहिवासी असलेली एका पंचविस वर्षीय विवाहीता घरात एकटीच होती.याचा फायदा घेत तिचा चुलत दिर घरात घुसुन तिचा हात धरला व माझ्या सोबत झोप असे अश्लील बोलूण विनयभंग केला म्हणून रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.