जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले जळगाव जिल्हा दौरा करीत असून फैजपूर-सावदा भुसावळ तसेच इतरत्र भागाचा पक्षीय आढावा घेत आहे, मात्र या मध्ये कॉग्रेस मध्ये असलेलय गटबाजीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे, कॉग्रेसचे जिल्ह्यातील महत्वपूर्ण दोन गट पक्षाच्या फैजपूर तसेच भुसावळ येथे होणाऱ्या कार्यक्रमात अनु उपस्थित राहिल्याने कॉग्रेस मधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राज्य नेत्तृत्व जिल्हा दौरा करीत असताना कॉग्रेस मध्ये कार्यकर्ते कमी नेते अधिक दिसून आले आहे जे कार्यकर्ते होते तेच आता नेते झाल्याने विविध गटांमध्ये विभागले गेले आहे यामुळे आपल्या गटाच्याच कार्यक्रमात उपस्थिती लावावी अशा सूचना देखील काही कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले हे जळगाव जिल्हा दौऱ्या कॉग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरतो कि मानापानाच्या गटबाजीला उधाण आणतो याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.
अब्दुल सत्तारांनी केले होते प्रयत्न
गेल्या काही वर्षांपूर्वी तत्कालीन कॉग्रेस नेते अब्दुल सत्तार हे देखील जळगाव कॉग्रेस भवनात आले असताना गट बाजी वरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता अब्दुल सत्तार यांनी प्रयत्न करून देखील कॉग्रेस मधील वाद सोडवण्यात त्यांना अपयश आले होते फैजपूर येथे कार्यक्रमात जिल्हा व प्रदेश पातळीवर काम करणारे फळीतील नेते अनुपस्थित असल्याचे जाणवत असताना मात्र कॉग्रेस भवनातील असलेल्या आयोजित कार्यक्रमात कॉग्रेसमधील सर्वच गट उपस्थित राहणार असल्याचे कॉग्रेस सूत्रांनी कळविले आहे.
काही जेष्ठ कॉग्रेस नेते, कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांच्या भेटी घेणार आहे, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कॉग्रेस पिछाडीवर कशी गेली ? या संदर्भात निवेदन देऊन नेमकी कारणे काय ? हि माहिती देण्यात येणार आहे, भविष्यात कॉग्रेसला संजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पोटोले यांनी गटबाजीला थारा न देता जिल्ह्यात बळ द्यावे असे देखील आव्हान करण्यात येणार आहे.