एरंडोल : विश्वास संपादन करून दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना विश्वास संपादन करून दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथे घडली.
येथून जवळच असलेल्या वनकोठे येथील नागेश्वर शेनपडू पाटील हे घरी नसताना अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांच्या आईला घरातील देवांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. तर देवांना पॉलिश केल्यानंतर विश्वास संपादित करून तसेच पाॅलिस करण्याचे लिक्विड शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगत तुमचे सोन्याचे दागिनेही पॉलिश करून घ्या, अशी विनवणी केली.
हळद आणायला सांगून काढला पळ
त्यानंतर त्यांच्याजवळील ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, ३ ग्रॅम वजनाची पोत, २ ग्रॅमचे पँडल, १ ग्रॅमचे मनी, २ ग्रॅम सोन्याचे कानातील लटकन तसेच ५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे काप असे जवळपास ६० हजारांचे सोन्याचे दाेघांनी घेतले. तर पाटील यांच्या माताेश्रींना हळद आणायला सांगितले. त्यानंतर दागिने घेऊन दुचाकीवरून पोबारा केला. याबाबत कासोदा पोलिसांत गुन्हा नोंद आहे.