जळगाव : जळगाव महापालिका आयुक्तपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. यासंदर्भात आयुक्त विद्या गायकवाड यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. या पदभाराची सुनावणी आज ‘मॅट’मध्ये पूर्ण झाली आहे. मात्र निकाल राखीव ठेवण्यात आला असून येत्या तीन चार दिवसात तो लागण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची २९ नोंव्हेंबर रोजी शासनातर्फे अचानक बदली करण्यात आली होती. परभणी येथील महापालिका आयुक्त देविदास पवार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पवार यांनी ३० डिसेंबर रोजी जळगाव येथे दाखल होवून पदभार स्विकारला होता.त्यावेळी बदली झालेल्या आयुक्त विद्या गायकवाड या प्रशिक्षणासाठी पुणे येथे होत्या.
पदभार देविदास पवार यांच्याकडेच…
आपल्या पश्चात पदाचा एकतर्फी पदभार स्विकारल्याबाबत डॉ.विद्या गायकवाड यांनी आपल्या बदलीला आव्हाण देणारी याचिका मॅट (महाराष्ट्र ॲडमिनीसट्रेशन ट्रीब्युनल)मध्ये दाखल केली होती. त्यावर ‘मॅट’ने डॉ.गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली मात्र आयुक्तपदाचा पदभार देविदास पवार यांच्याकडेच ठेवला होता.
चार दिवसात निकाल येणार
कायम पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू होती, त्यावर आजपर्यत मॅट मध्ये एकूण सहा तारखा झाल्या आहेत. आजही सुनावणी होती, त्यावर आज निकाल येण्याची अपेक्षा होती, मात्र आज दोन्ही गटाची सुनावणी ‘मॅट’मध्ये पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र निकाल राखीव ठेवण्यात आला असून येत्या तीन ते चार दिवसात निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे.