जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्त्वपूर्ण बैठक वसंतस्मृती भाजपा कार्यालय जळगाव येथे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेशाकडून राबविण्यात येणारे आगामी कार्यक्रम परीक्षा पे चर्चा, लोकसभा प्रवास, जी20, सरल पोर्टल यासंदर्भात माहिती व चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर 29 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुथ वर होईल यासाठी नियोजन करण्यात आले. या बैठकीला रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, सरचिटणीस मधुकर काटे जिल्हा उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, पद्माकर महाजन यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत यांची होती उपस्थिती
बैठकीस हिराभाऊ चौधरी, पी सी आबा पाटील, रेखाताई चौधरी, कांचनताई फालक, प्रल्हाद पाटील, अजय भोळे, जिल्हा चिटणीस राजूभाऊ सोनवणे, नवल पाटील, सविताताई भालेराव,सोमनाथ पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन, महिला मोर्चा अध्यक्ष रेखाताई पाटील, चंद्रशेखर अग्रवाल, आरिफ शेख, व्ही आर पाटील, सुनील पाटील, भरत महाजन, जिल्हातील सर्वमंडल अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी, व सोशल मिडिया संयोजक उपस्थित होते.