जळगाव राजमुद्रा | येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्यात मुख्य संशयित असलेले सुनील झंवर आणि त्यांचा मुलगा सुरज झंवर आहे. यांना मोक्याच्या गुन्ह्यात बसवण्याची धमकी दाखवून राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी 1:25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार जवळ यांच्यासोबत घडल्याने झंवर पुत्र असलेले सुरज झंवर यांच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरज झंवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी दोन कोटी रुपया मधील एक कोटी, 22 लाख रुपये प्रवीण चव्हाण आणि त्यांच्या दोन साथीदारांनी घेतल्याची तक्रार सुरत जवळ रा. जळगाव यांनी डेक्कन पोलिसात दाखल केली आहे. यापैकी चव्हाण यांचे दोन साथीदार असलेले उदय नानाभाऊ पवार आणि शेखर मधुकर सोनाळकर यांची नावे देखील तक्रारीत नोंद करण्यात आली आहे.
सुरज झंवर यांनी दिलेली फिर्याद..!
सुरज झंवर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद तसेच राजमुद्राच्या माध्यमातून आम्ही मांडत आहोत, यामध्ये सुरत जवळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझे वडील कारागृहात असताना माझ्या वडिलांना तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही मोक्का लावून कारवाई करू.. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला यामध्ये अडकवून टाकेन अजूनही खूप गुन्हे दाखल होतील अशी धमकी देऊन मला भीती घालून माझ्याकडून एक कोटी 22 लाख रुपये इतकी रक्कम आरोपींनी वसूल केली असल्याचे सुरज झंवर यांनी म्हटले आहे. यापुढे दोन कोटी पैकी एक कोटी रुपये प्रवीण चव्हाण यांनी ठेवले व वीस लाख रुपये उदय पवार यांनी मध्यस्थी करण्याच्या मोबदल्यात व दोन लाख रुपये अहवालाच्या मोबदल्यात घेतले अशाप्रकारे एक कोटी 22 लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
अँड प्रवीण चव्हाण यांनी ते विशेष सरकारी वकील असल्याने त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यापोटी मला धमकी देत माझ्याकडून खंडू बसवली केली मला खोटे आश्वासन देऊन ते माझे वडिलांना जामीन मिळवून देऊ शकतात अशी बतावणी केली जामीन हा न्यायालयात केवळ गुणवत्तेवरच होणार आहे याची संपूर्ण जाणीव व माहिती असूनही त्यांनी सदर रक्कम काढणे स्वरूपात वसूल करून माझी फसवणूक केली अशाच प्रकारे खोट्या तक्रारी नोंदवून काढणी वसूल करण्याचे रॅकेट सुरू असल्याचे सुरज झंवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींनी आपसात संगणमत करून सरकारी लोकसेवक असल्याचा पदाचा गैरवापर मला व माझ्या वडिलांना नुकसान पोहोचवण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्याचा पेरवापर करून माझ्या वडील यांना जामीन मिळणे कामे सहकार्य करीन असे आश्वासन देऊन तसेच कोथरूड पोलीस ठाणे येथील दाखल करण्यात मला अडकवण्याची भीती घालून तसेच मला व माझ्या वडिलांना मोका लावून त्यात अडकवण्याची भीती घालून आर्थिक फसवणूक केली असल्याचे सुरत झंवर यांनी डेक्कन पोलिसात दाखल फिर्यादीत म्हटले आहे.