नवी दिल्ली : सरकारने 128 औषधांच्या किमतीत बदल केला आहे. यामध्ये अँटीबायोटिक्स आणि अँटीव्हायरल औषधांचा समावेश आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे आणि निश्चित केलेल्या कमाल किमतींची माहिती शेअर केली आहे. ज्या औषधांच्या किमती सुधारल्या आहेत त्यात पॅरासिटामॉल, आयब्रूफेन, अमोक्सिसिलिन आणि इतरांचा समावेश आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणारी NPPA ने यामध्ये अमोक्सिसिलिन आणि क्लॅव्युलेनिक ऍसिडचे अँटीबायोटीक इंजेक्शन, व्हॅनकोमायसिन, दम्यामध्ये वापरले जाणारे सॅल्बुटामोल, कर्करोगाचे औषध ट्रॅस्टुझुमॅब, वेदना कमी करणारे Ibuprofen आणि तापाचे औषध Paracetamol यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, Amoxicillin कॅप्सूलची किंमत 2.18 रुपये तर Cetirizine टॅब्लेटची किंमत 1.68 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Ibuprofen आता या किमतीत मिळणार
NPPA च्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर प्रमुख औषधांबद्दल सांगायचे तर, Ibuprofen 400 MG टॅबलेट आता 1.07 रुपयांना विकले जाऊ शकते. याशिवाय पॅरासिटामॉल, फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, डिफेनहायड्रॅमिन हायड्रोक्लोराइड आणि कॅफिन टॅब्लेटची किरकोळ किंमत 2.76 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच Amoxicillin आणि Clavulanic Acid इंजेक्शनची कमाल किंमत 90.38 रुपये ठेवण्यात आली आहे.
मधुमेहाच्या औषधांमध्येही बदल
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, औषध कंपन्या त्यांची औषधे सरकारने ठरवून दिलेल्या किमतीतच विक्री करतील. मात्र, या सर्व औषधांच्या किमती जीएसटी दराशिवाय आहेत. NPPA ने ड्रग्ज प्राइस कंट्रोल ऑर्डर (DPCO), 2013 अंतर्गत 12 अधिसूचित फॉर्म्युलेशनच्या किरकोळ किमती देखील निश्चित केल्या आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या Glimepiride, Voglibose आणि Metformin च्या मिश्रणाच्या टॅब्लेटची किंमत 13.83 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
NPPA 1997 पासून कार्यरत
हे लक्षात घेण्यासारखे आहे की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच NPPA, सन 1997 मध्ये स्थापित, फार्मास्युटिकल उत्पादनांच्या किंमती नियंत्रित करते आणि सुधारित करते. तसेच DPCO च्या तरतुदींची अंमलबजावणी करते आणि नियंत्रित औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवते.