मुंबई : राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने (NHB) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत बँक विविध रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. जे उमेदवार राष्ट्रीय गृहनिर्माण बँक त अर्ज करू इच्छितात त्यांना उत्तम नोकरीची संधी मिळेल. यासाठी इच्छुक उमेदवारांना nhb.org.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 6 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, व्यवस्थापक अशा एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निकष आहेत. पदानुसार उमेदवारांनी पदवी / अभियांत्रिकी पदवी / CA/ MCA / MBA / PG पदवी / एमफिल / पीएचडी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.
पगार किती मिळणार :
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 48,170 रुपये ते 1,29,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
आवश्यक वयोमर्यादा :
अधिसूचनेनुसार, या भरतीअंतर्गत दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 23 ते 55 वर्षे दरम्यान असावे.
फी किती लागणार:
राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या भरतीसाठी अर्ज करणार्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क भरावे लागेल.
असा करा अर्ज :
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवार nhb.org.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करु शकतात.
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 आहे.
- या तारखेपर्यंत दाखल केलेले अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरले जातील. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करु शकतात.
- भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.