रावेर : पिस्तुलाचा धाक दाखवून घरात घुसत चोरी केल्याची घटना तालुक्यातील विवरा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
तालुक्यातील विवरे बुदुक येथील किशोर पीतांबर राणे यांच्या घरात शिरून चोट्यांनी लुट करून पलायन केल्याची घटना घडली आहे. रात्री लघुशंकेसाठी उठले असतांना अज्ञात चोरट्यांनी कानाला पिस्तुल लाऊन राणे यांना घरात नेले. यानंतर सोन्याचे दागिने व रोकड मागितली. यात कपाटातील २ तोळे सोने, तसेच पंधरा हजार रूपये रोख असा ऐवज त्यांनी सोबत घेतला. यानंतर त्यांनी किशोर राणे यांचे हात-पाय व तोंड बांधून तेथून पळ काढला.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर राणे यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरी होते. रात्री लघुशंकेसाठी उठल्यानंतर चोरट्यांनी पिस्तुल लाऊन त्यांना लुटले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.