जळगाव – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गेल्या 8 दिवसांपासून नॉटरिचेबल असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांच्या अचानक नॉटरिचेबल होण्यामुळे जळगावसह राज्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, ते आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत आहेत, त्यांना आराम करण्यास सांगितले असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्या कुटुंबीयांनी दिले.
एकनाथ खडसे नॉटरिचेबल झालेले नव्हते, तर, खडसेंच्या पायाची नस दुखावली गेल्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. साधारण तीन ते चार दिवस उपचार घेऊन खडसेंना घरी सोडण्यात आले असून, ते घरी आराम करत आहेत. यामुळे त्यांचे दोन्ही फोन लागत नसल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे.
पायाच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल
एकनाथ खडसेंशी गेल्या आठ दिवसांपासून संपर्क होत नसल्याने ते नॉटरिचेबल असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. परंतु, आता खडसे त्यांच्या पायाच्या उपचारांसाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. यामुळेच त्यांचे फोन लागत नसल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे खडसे नॉटरिचेबल असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.