मुंबई : राखी सावंतबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राखी सावंतला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राने ट्विट करून राखीबद्दलची माहिती दिली आहे. काही काळापूर्वी शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले आहे.
बिग बॉस 16 सुरू झाल्यानंतर शर्लिन चोप्राने मेकर्सवर साजिद खानवर बाबत नाराजी व्यक्त केली होती. शर्लिनने सांगितले की, ज्या व्यक्तीने अनेक मुलींचे शोषण केले आहे. त्याला शोमध्ये येण्याचा अधिकार नाही. यानंतर शर्लिनने साजिद खानविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. राखी सावंत साजिदला भाऊ मानते. त्यामुळेच तिने शर्लिनचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पैपराझीसोबतच्या संभाषणात राखी सावंतने शर्लिनविरोधात अनेक चुकीच्या गोष्टी बोलल्या. राखीच्या तोंडून स्वतःबद्दल असभ्य कमेंट ऐकून शर्लिनला राग आला आणि तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मात्र, शर्लिन चोप्राच्या आधी राखी सावंतने तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र
पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर शर्लिनने त्यावेळी एक ट्विटही केले होते. ट्विट करताना शर्लिनने लिहिले की, कलम 499, कलम 500, कलम 509 आणि कलम 503 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शर्लिनची ही तक्रार जुहू पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. शर्लिनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना पत्रही लिहिले आहे. या पत्रात शर्लिनने साजिद खानवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे.