मुंबई : चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने कनिष्ठ सुरक्षा अधिकारी या पदांसाठी एकूण जागा 34 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
शैक्षणिक पात्रता
– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कोणत्याही फिल्डमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
– मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
पगार किती मिळणार?
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदासाठी – 37,340/- – 1,03,375/- रुपये प्रतिमहिना
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 500/- रुपये
इतर सर्व प्रवर्गासाठी – 300/- रुपये
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
– बायोडेटा
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/magenjodec22/ या लिंकवर क्लिक करा.