जळगाव : तुम्ही राजकीय पक्ष गट तट यांच्यामध्ये सत्तेवरून वाद राजकारण्यांमध्ये बघितला असेल, मात्र जळगाव आयुक्त पदाच्या खुर्चीवरून वाद रंगला आहे. आज मॅट कोर्टात निकाल असून, सर्वांचेच याकडे लक्ष वेधले गेले आहे.
जळगाव महापालिकेचा राजकारण काही वेगळंच आहे. इथं घडणाऱ्या घटना देखील अनोख्या आहेत. भाजपमधून झालेले बंडखोर नगरसेवकांनी दिलेली शिवसेनेला साथ पुन्हा बंडखोर नगरसेवकांनी राज्यातील सत्तांतरण होताच शिंदे गटात केलेला प्रवेश अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे.
आता अंतिम फैसला बाकी
मात्र हा झाला राजकारण्यांचा सत्तेचा खेळ मात्र अधिकाऱ्यांमध्ये आयुक्त पदाच्या खुर्चीवरून महापालिकेत वाद रंगला आहे. हा वाद फक्त वाद राहिला नाही तर थेट मॅट सारख्या न्यायालयात याबाबत सुनावणी चालली आहे मात्र आता अंतिम फैसला येणे बाकी आहे.
फाईलींवर सह्या रखडल्या
जळगाव मनपाच्या आयुक्त पदाचा वाद हा आता चिघळला असून सध्या नेट कोर्टात याबाबत न्यायालयीन वाद सुरु आहे. पर्यायी आयुक्त असलेल्या देविदास पवार यांना न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू असल्यामुळे देविदास पवार यांना कोणतेही प्रशासकीय निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक असलेल्या निर्णया व्यतिरिक्त देविदास पवार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. अशावेळी प्रत्येक विभागातील कित्येक फायलींवर देविदास पवार यांना सह्या करता येत नाहीत. पर्यायी जळगाव शहराचा विकास रखडला जात आहे.
सुनावणी झाली पूर्ण
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची केवळ सात महिन्यात तडका फडकि बदली करण्यात आली. त्यांना इतर कोणत्याही ठिकाणी त्यांना पद देण्यात आले नाही. यामुळे या निर्णयाविरोधात विद्या गायकवाड नेट कोर्टात गेल्या. नेट कोर्टात गेल्यावर महिन्याभरापासून याबाबत वात प्रतिवाद झाले. आता सुनावणी झाली असून, निकाल काय लागतो याकडे लक्ष वेधले गेले आहे.
तीन वर्षापासून विकास रखडला
जळगाव शहर महानगरपालिका ही सध्या खऱ्या अर्थाने विकासहीन महानगरपालिका ठरत आहे. गेल्या अडीच तीन वर्षापासून जळगाव शहरात विकास झालेला नाही. पर्याय नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. मात्र आता सुरू असलेल्या आयुक्त पदाच्या त्याची न्यायालयीन लढाईमुळे आयुक्त असूनही आयुक्तांना निर्णय घेता येत नाहीत.