नाशिक : राज्यात आगामी काळात महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने भाजपने आत्तापासूनच कंबरी कसली असून, जोरदार तयारी सुरु केली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः नाशिकमध्ये जाहीर सभा घेत राज्य अधिवेशन घेणार आहे. त्याची भाजपकडून तयारी केली जात आहे.
भाजपचे राज्य अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये होणार आहे. 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी नाशिकच्या तपोवनातील साधुग्राम मैदानावर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने नाशिकचे प्रभारी आणि पदाधिकारी याबाबत नियोजन करत आहे. 2024 च्या निवडणुकीची पूर्वतयारी भाजपकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रचार कायम ठेवण्यासाठी भाजपकडून जाहीर सभा घेतल्या जात आहे.
भाजपकडून वातावरण निर्मिती
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता भाजप नेते कामाला लागले आहेत. राज्यात विविध ठिकाणी जाहीर सभा, पक्षीय अधिवेशन, कोअर कमिटीच्या बैठका आयोजित करत वातावरण निर्मिती केली जात आहे. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित हे राज्य अधिवेशन होणार आहे. हजारो पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे पदाधिकारी या राज्य अधिवेशनाला सहभागी होणार आहे.