मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत असून एमपीएसीकडून आत्तापर्यंतची सर्वात मोठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार जवळपास 8 हजार पदांसाठी मेगाभरती होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 25 जानेवारी 2023 पासून – अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.
37 जिल्हा केंद्रांवर होणार परीक्षा
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 8169 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 रविवार, दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :
1) सहायक कक्ष अधिकारी:- 78 पदे
2) राज्यकर निरीक्षक :-159 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक:- 374 पदे
4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-49 पदे
5) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) :- 6 पदे
६) तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) :- 1 पदे
७) कर सहाय्यक, गट-क (वित्त) :- 468 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
८) लिपिक-टंकलेखक :- 7034 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1. सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
2. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील
3. अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे..
4. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट: 1 मे 2023 रोजी
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी : 31 वर्ष
इतर सर्व पदांसाठी : 38 वर्ष
[मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-