जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | धरणगाव तालुक्यातील पाळधी येथिल माहेर असणाऱ्या पत्नीचा पतीने रागातून चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. पूजा सुनील पवार वय २६ यांचा विवाह शहरातील शिवाजी नगर येथील सुनील पवार वय ३४ याच्याशी झाला होता. पतीच्या जाचाला कंटाळून महिला फेब्रुवारी महिन्यापासून पाळधी येथे माहेरी आली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी त्याला २२ रोजी चौकशीसाठी बोलावले असता, संतापातून सुनील पवार याने आज दुपारी पाळधी येथील मारवाडी गल्ली मध्ये पत्नी पुजाला अडवून तिच्यावर अमानुष पणे चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर पूजा हिचा भाऊ शंकर चव्हाण याच्यावरही त्याने हल्ला केला. व त्यात तरूण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.