मुंबई: लाइफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)ने मेगाभरती जाहीर केली आहे. यात अॅप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर (ADO) च्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण LIC ने 9000 हून अधिक पोस्ट अधिसूचित केल्या आहेत. या रिक्त जागा आठ विभागांमध्ये उपलब्ध आहेत.
एलआयसीने जाहीर केलेल्या ADO पदांची नोंदणी प्रक्रिया त्यांच्या अधिकृत पोर्टलद्वारे केली जाईल. LIC ADO 2023 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कॉर्पोरेशनच्या करिअर पेजला भेट देऊ शकतात. अर्ज पाठविण्यासाठी 21 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून, 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आवश्यक पात्रता:
– एलआयसी एडीओ पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार पदवीधर असावेत.
– उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कशी होणार निवड?
– LIC ADO ची निवड ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक) त्यानंतर ऑनलाइन परीक्षा (मुख्य) आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
पगार किती मिळणार
– ॲप्रेंटीस कालावधी दरम्यान उमेदवारांना प्रति महिना रु.51500 स्टायपेंड.
– प्रशिक्षणानंतर 35,650-2200(2)-40, 050-2595(2)-45, 240-2645(17)-90, 205 अधिक भत्ते आणि लागू नियमांनुसार इतर लाभ मिळतील.
– प्रोबेशनरी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्यावर, मूळ वेतन रु.35650 प्रति महिना असेल.