मुंबई: कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. आयोगाने एकूण 11409 जागांची अधिसूचना जारी केली आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कर्मचारी निवड आयोग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 ही आहे.
कर्मचारी निवड आयोग येथे होणाऱ्या भरती संदर्भात शैक्षणिक पात्रता काय आहे. नोकरीचे ठिकाण कोणते आहे. वेतनमान, वयोमर्यादा, एकूण रिक्त पदे किती आहेत आदी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
MTS आणि हवालदार पदासाठी भरती
कर्मचारी निवड आयोग (SSC) ने MTS आणि हवालदार भरतीसाठी एकूण 11409 जागांची अधिसूचना जारी केली आहे. ज्याद्वारे आयोगाने एमटीएसच्या 10,880 आणि हवालदाराच्या 529 पदांची भरती जाहीर केली आहे. अधिसूचना जारी होताच, भरती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जही सुरू झाले आहेत.
शैक्षणिक पात्रता
एमटीएस आणि हवालदार पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. आणि उमेदवारांचे वय 18-25 वर्षे असावे. तथापि, काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.
अर्ज शुल्क : 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज कसा करायचा
उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. यासाठी भरती लिंकवर जाऊन उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरावा लागेल आणि फी जमा करावी लागेल. लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. आणि फी जमा करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडीसाठी संगणक आधारित चाचणी घेतली जाईल. मात्र, हवालदार पदांसाठी परीक्षेनंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच पीईटीही द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये पुरुष उमेदवारांना 15 मिनिटांत 1600 मीटर चालावे लागेल. त्यामुळे महिला उमेदवारांना 1 किलोमीटरची शर्यत 20 मिनिटांत पूर्ण करावी लागते.